नाविन्यपूर्ण उपक्रम
वर्ग 1, 2 , अप्रगत विद्यार्थी व प्राथमिक वर्गासाठी*
*नमस्कार सर्व विदयार्थी, पालक व शिक्षक मित्रांनो.*
*पुढील कृती व उपक्रम पालकांमार्फत विदयार्थ्यांपर्यंत पोहचवून मूलभूत वाचन व गणित संबोध उद्दिष्ट साठी आनंददायी खेळ विदयार्थ्यांनी खेळायचे आहे.*
*खालील कृती वेगवेगळ्या विषयासाठी दिल्या असल्या तरी त्यांचा आंतरसंबंध आहे.*
*विषय - मराठी*
*भाषण - संभाषण*
*🟣ओळख स्व:ची, कुटुंब, मित्र, परिसर याविषयी माहिती सांगणे.*
*🟣चित्रगप्पा*
१)चित्र सांगणे.
२)चित्रातील कृती सांगणे.
३) चित्रवर्णन करणे.
४)चित्रावरून गोष्ट सांगणे.
५)चित्रमालिकेवरून गोष्ट सांगणे.
🟣गप्पा -
१) औपचारिक गप्पा उदा.( आठवडी बाजार ) विषय ठरवून मुलांशी गप्पा करणे.
२)अनौपचारिक गप्पा (विषय न ठरवता गप्पा) मुलांशी करणे.
*🟣संवाद, नाटुकली सादर करणे*
*🟣 प्रश्न विचारता येणे.*
*🟣मत व्यक्त करणे.*
*🟣घटनाक्रम सांगता येणे.उदा - चहा तयार करण्याचा घटनाक्रम*
*🟣गोष्टी*
१)ऐकलेली गोष्ट सांगता येणे.
२) ससा - कासव सारखे शब्द देऊन त्यावर गोष्ट सांगता येणे.
३)अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.
४)अपूर्ण प्रसंग पूर्ण करा.
*🟣गाणी*- ऐकून म्हणणे
१) अक्षरांची पुनरावृत्ती होणारी गाणी.
२)यमक जुळणारी गाणी
३) बडबड गिते
*🟣पारंपारिक गाणी एकवीने व म्हणून घेणे*
१)भुलाबाई ची गाणी
२)भजन
३)अभंग इ.
*🟣खेळ--*
१)वन मिनिट शो (मुलाने एका परिचित विषयावर बोलणे)
२)शब्दभेंडया उदा - ब ध्वनी ने सूरु होणारे शब्द सांगा. सांगितलेले शब्द बोर्डवर लिहिणे.
३)एक शब्द देऊन वाक्य मुलांनी सांगणे.
४)थीम च्या संदर्भात शब्द लिहिणे.
*🟣प्रश्न मंजुषा, विनोद कार्यक्रम घेणे*
*🟣चित्रवाचन* विदयार्थ्यांना वस्तू किंवा चित्र दाखवून
१)एका वस्तूचे चित्र वाचन
२)कृतीचे चित्र वाचन
३)चित्रातील भावनांचे वाचन
🟣मॅचिंग सेट -
सारखी चित्रे एकमेकावर ठेवणे.
🟣चित्रगाडी (बाणानुसार चित्र जोडणे)
उदा -कुत्रा 🔜🐶मांजर 🔜🐱उंदीर 🐭🔜माकड 🐒😀
*🟣वलयांकित चित्रमय दिशादर्शक पट्टी वाचन(डावी कडून उजवीकडे बोटाने गिरवत वाचणे.*
उदा -🐱〰️〰️〰️〰️〰️🐭
अश्या चित्रमय पट्ट्या तयार करून वाचन सराव
🟣पट्टीवरील चित्र वाचन(डावी कडून उजवी कडे )
उदा - हा 🐒 आहे.
हि 🐄आहे.
*🟣चित्रातील वेगळा ओळखा.*
उदा -🐶🐱🐭🐒🦋
यात फुलपाखरू वेगळा आहे.
*🟣चित्र साम्यभेद ओळखणे.*
जसे -वर्ग २ री पान न. १ वर
*🟣चित्रवर्णन (मुल चित्र वर्णन करतात)*
*🟣चित्रगप्पा(मुले चित्र गप्पा करतात)*
*🟣चित्र कथा सांगणे (चित्र निरीक्षण करून )*
*विषय - गणित*
*गणनपूर्व तयारी*
*🟢१ - एक अंक ओळख व लेखन सराव*
अंक ओळख देतांना -
१)एक बोट दाखवून
२)एक वस्तू दाखवून
३)एक चित्र दाखवून
४)एक असा आवाज करून
५)एक रुपयाचं नाणं वा नोट दाखवून
६)हातात वस्तू घेऊन -आईने एक लाडू दिला अशा गोष्टी सांगण्यास मुलांना प्रोत्साहन देणे.
७)एक अंक अंक व अक्षरात काढून
८) एक उडी मार कृती करून
९)स्पर्शाने ओळखणे खेळ घेऊन
*🟢१ अंक गिरवणे व लेखन सराव*
*🟢२ - दोन अंक ओळख व लेखन वरील नऊ भाषा नुसार*
*🟢३-तीन अंक ओळख व लेखन सराव वरील प्रमाणे.*
*🟢४- तीन अंक ओळख व लेखन*
*🟢५-पाच अंक ओळख व लेखन*
*🟢बेरीज : + चिन्ह ओळख व क्रिया*
बेरीज म्हणजे -मिळविने, एकत्र करणे, टाकणे, गोळा करणे, ओतने इ.
गोष्टीतून बेरीज करविने.
➕उदा - साहिलला बाबाने १लाडू दिले, आईने २ लाडू दिले, तर साहिल जवळ एकूण किती लाडू झाले?
१ लाडू बाबाने
+ २ लाडू आईने
-------
३ एकूण लाडू
असे उदाहरण लिहून गोष्टी सांगण्यास प्रोत्साहन द्यावे.
गोष्टी तयार करून सोडवून घेणे.
२ ३ ४ १
+ २ + २ + १ +४
-------- -------- ------- -------
आडवी मांडणी बेरीज सराव-
१+२=
२+२=
२+३=
२+१=
३+२=
*🟢बेरीज उदाहरण सराव घ्यावा.*
*🟢वजाबाकी : - चिन्ह ओळख व क्रिया*
वजा म्हणजे - कमी, काढणे, फेकने, तुटणे, सडने, हरवने, देणे इ.
गोष्टीतून संकल्पना स्पष्ट करणे. मुलांनी गोष्ट सांगणे.
उदा - साहिलजवळ २ पेन्सिल होत्या, त्यातील १ हरवली, तर साहिल जवळ किती पेन्सिल राहिली ?
उभी मांडणी -
२ साहिल जवळ पेन्सिल
- १ पेन्सिल हरवली
--------
१ राहिली
३ ४ ५ ४ ५
-१ - १ -१ - २ -२
------ ------ ------- ------- -------
आडवी मांडणी :
२-१=१
३-१=२
४-१=३
५-१=४
*🟢० ची ओळख मुलांना गोष्टीतून करविणे.*
*🟢मुलांनी ० च्या गोष्टी सांगणे.*
उदा - जय जवळ १ पेन्सिल होती ती त्याने साहिलला दिली, तर आता जय जवळ पेन्सिल किती?
१-१= १ २ ३
२-२= - १ - २ -३
३-३= --------- ------ ------
४-४=
५-५=
१ च्या गोष्टी तयार करणे.
उदा -१+०=१ २-१=१ ३-२=१
मिश्र उदाहरणे -
२+१-२=१ ३+२-४=१
*यात आपणही भाषा, गणित पूर्व तयारी संबंधी आनंददायी पूरक कृती जोडणार आहातच.*
*✔️महत्वाचे ---*कृतीमधे परिपूर्णता येई पर्यंत कृती पून्हा पुन्हा करून घ्यायच्या आहेत.*
- संदीप कोल्हे, यवतमाळ
0 Comments