Right To Read अंतर्गत Read To Me (इंग्रजी वाचन आणि आकलनास मदत करणारी) या उपक्रमाची राज्यातील शासकीय शाळा , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांमध्ये अंमलबजावणी करण्याकरीता , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , महाराष्ट्र शासन आणि School net India Ltd & English Helper education technology Pvt . Ltd मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे .
सदर उपक्रमांतर्गत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषा समृद्धीकरीता विविध शैक्षणिक कृती ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
Read To Me या ॲपची
1) विद्यार्थी आवृत्ती ( Student Edition )
2) शिक्षक आवृत्ती ( Teacher dashbord )
3) शाळा आवृत्ती (School Edition)
उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
💥 ReadToMe Student Ediion ची वैशिष्ट्ये -
१) मजकूराचे वाचन ( Reading): हे ॲप तुम्हाला आवडेल त्या वेगाने वाचेल.
२) शब्दांचे हायलाइटिंग( Text Highlighting): चांगले शिकण्यासाठी प्रत्येक शब्द वाचताना हायलाइट केला जातो.
३) इंग्रजी शब्दकोश (English Dictionary) : तुमच्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक शब्दाचा इंग्रजी अर्थ शोधा.
४) चित्र शब्दकोश (Picture Dictionary): चित्रांसह शब्दांचे अर्थ जाणून घ्या.
५) शब्दलेखन करा ( spell word) : तुमच्या पाठ्यपुस्तकातील कोणत्याही शब्दाच्या स्पेलिंगचा सराव करा.
६) शब्दाचा उच्चार करा ( Pronounce Word): तुमच्या पाठ्यपुस्तकातील कोणत्याही शब्दाचा उच्चार कसा करायचा ते शिका.
७) शब्दाचे भाषांतर करा (Translate Word) : कोणत्याही शब्दाचे स्थानिक भाषेत भाषांतर करा.
८) Magnify word : शब्दाचा आकार मोठा करून वाचन करा
💥 घरच्या घरी तुमचे इंग्रजी वाचन आणि आकलन सुधारा ( Study From Home)
1) ReadToMe इंग्रजी वाचन आणि आकलन होण्यासाठी उपयुक्त सॉफ्टवेअर / ॲप आहे.
2) हे ॲप विद्यार्थ्यांना इंग्रजी पाठ्यपुस्तके वाचण्यास आणि समजून घेण्यास मदत करेल.
3) ReadToMe विद्यार्थी Edition घरी इंग्रजी शिकणे सोपे करते.
4) Live विद्यार्थ्यांना शाळेत शिकलेल्या गोष्टींची उजळणी आणि सराव करण्यास मदत करतात.
5) लाइव्ह इंग्लिश क्लासेस विद्यार्थ्यांना शाळेत शिकलेल्या गोष्टींची उजळणी आणि सराव करण्यास मदत करतात.
6) विद्यार्थ्यानी केलेली उजळणी , अभ्यास याची प्रोग्रेस (progress) तपासायला मदत होते .
विद्यार्थी त्यांच्या शाळेतील इंग्रजी पाठ्यपुस्तकांमध्ये ReadToMe Student Edition विद्यार्थी आवृत्तीसह ऑनलाइन प्रवेश करू शकतात:
उपलब्ध पाठ्यपुस्तके 👇
👉 1 ते 12 वी साठी NCERT इंग्रजी पाठ्यपुस्तके
👉महाराष्ट्र राज्य मंडळ:
- इयत्ता 1 ते 10 साठी इंग्रजी माध्यमाची पाठ्यपुस्तके
- इयत्ता 1 ते 10 साठी मराठी माध्यमाची पाठ्यपुस्तके
🔻राज्य मंडळाची इतर पुस्तके उपलब्ध आहेत:
👉 इयत्ता 6 ते 8 साठी महाराष्ट्र राज्य मंडळ इतिहास आणि नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तके
👉 इयत्ता 6 ते 8 साठी महाराष्ट्र राज्य बोर्ड भूगोल पाठ्यपुस्तके
Read To Me App - Student Edition डाऊनलोड करण्यासाठी व रजिस्टर करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
1) सर्व प्रथम खाली क्लिक करून Read To Me -. Student Edition हे ॲप डाऊनलोड करून install करा. 👇
2) App install केल्यानंतर ओपन करा व START NOW वर क्लिक करा.
3) त्यानंतर पुढील पेजवर तुमचा मोबाईल नंबर किंवा email address टाका व खालील बटनावर वर क्लिक करा.
4) त्यानंतर पुढील पेजवर तुमची ( विद्यार्थ्यांची ) माहिती भरा. त्यात खालील प्रमाणे माहिती भरावी.
👉 Full Name -
👉 Password - ( येथे कोणताही पासवर्ड टाकावा )
👉 Class - तुमचा वर्ग सिलेक्ट करा.
👉 School board - येथे Maharashtra board सिलेक्ट करा.
👉 School Location - येथे Maharashtra सिलेक्ट करा.
👉 Email address - येथे मेल आयडी असल्यास टाकावा.
त्यानंतर ▶️ वर क्लिक करा.
अशा प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. आता तुम्ही हे ॲप वापरू शकतात.
Read To Me App कसे वापरावे ? ( How to use ReadToMe App)
👉 Read To Me App वापरण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
1) ॲप रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर तुम्हाला ॲप चे Home Page/ Dashboard दिसेल.
त्यात Read Your School Textbooks वर क्लिक करा.
2) त्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या विषयाच्या Book वर क्लिक करा. त्याखाली Books मधील Units दिसतील. त्यातील आवश्यकतेनुसार Unit select करा व Download वर क्लिक करा.
3) त्यानंतर डाऊनलोड केलेले unit ओपन करा. त्यात खालील प्रमाणे विविध पर्याय दिसतील.
1) Play - या वर क्लिक करून तुम्ही Unit/lesson चे Reading ऐकू शकतात.
2) Translate word - Unit / lesson मधील हवा तो शब्द तुम्ही मराठी / हिंदी भाषेत translate करू शकतात
3) Picture Dictionary - चित्रांसह शब्दांचे अर्थ जाणून घेऊ शकतात.
4) Pronounce Word - तुमच्या पाठ्यपुस्तकातील कोणत्याही शब्दाचा उच्चार कसा करायचा ते तुम्ही शिकू शकतात.
5) English Dictionary - तुमच्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक शब्दाचा इंग्रजी अर्थ शोधा.
* Read To Me App वापरण्यासाठी खालील मागदर्शक videos पाहा .
0 Comments